देशात भाजप बाजी मारत असताना भाजपचा ‘हा’ मंत्री निवडणूक हरण्याची शक्यता

निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आणि देशभरात भाजप प्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. एनडीएचा देशातला आकडा ३४४ पर्यंत गेला आहे. तर यूपीएला शंभरीही गाठता आलेली नाही. भाजपने यशस्वी कामगिरी केली असली तरी त्यांचा राज्यातील एक खासदार आणि मंत्री पराभवाच्या छायेत आहे. चंद्रपूरमधून निवडणूक लढवत असलेले हंसराज अहिर यांना काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी पिछाडीवर टाकलं आहे. मुख्य म्हणजे राज्यात एकाच जागेवर काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे देखील पिछाडीवर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा