InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

देवेंद्र फडणवीसांना धक्का; ‘या’आमदाराने सोडली साथ

- Advertisement -

ज्यात भाजप सगळ्यात मोठा पक्ष होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकांआधी भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग झालं. अशात विधानसभा निवडणुकांमध्ये सगळ्यात मोठा पक्ष असून सुद्धा भाजपला विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली. त्यामुळे आता भाजपमध्ये आऊटगोईंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे. कारण, चंद्रपूरचे अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.  निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर असा राजकीय पेच निर्माण झाला होता की त्यामुळे नेमकी सत्ता कोण स्थापन करणार यावरून सगळ्यांमध्ये संभ्रम होता. तसंच खरंतर किशोर जोरगेवार यांच्याबाबत झालं आहे.

- Advertisement -

Loading...

आमदारकी जिंकल्यानंतर किशोर जोरगेवार यांनी भाजपला बहुमत पाहून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, आघाडीचं सरकार येताच त्यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कुठेतरी हा भाजपसाठी चंद्रपूरमधून धक्का मानला जातो. अजिप पवार यांच्यासोबत भाजपने हातमीळवणी केल्यानंतर घोडेबाजार टाळण्यासाठी भाजपने 6 अपक्ष आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवलं होतं. यामध्ये जोरगेवारदेखील होते. पण बहुमत सिद्ध करण्याआधीच देवेंद्र फडणवीसांनी पदाचा राजीनामा दिला आणि सरकार कोसळलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.