Chandrasekhar Bawankule | राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर पक्षातील नेत्यांचा कब्जा – चंद्रशेखर बावनकुळे
Chandrasekhar Bawankule | मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होऊन इतर पक्षातील कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये जाण्याच्या ऐवजी कॉंग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधी याची यात्रा त्या पक्षातील नेत्यानी ‘हायजॅक’ केली असून त्याच्या पक्षाला यात्रेचा काही फायदा होणार नाही, उलट नुकसानच होईल, असे मत भारतीय जनता पार्टीचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी शनिवारी व्यक्त केले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर (Bharat Jodo Yatra) त्या पक्षातील नेत्याचा कब्जा आहे. ते कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांना भेटू देत नाहीत. परिणामी या यात्रेमुळे त्यांचा पक्ष वाढण्याच्या ऐवजी कमकुवत होत आहे. अन्य पक्षातील नेते कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत नाहीत. उलट काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. नंदुरबारच्या काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी आजच भाजपामध्ये प्रवेश केला. २०२४ ची आगामी निवडणूक येईपर्यंत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करतील.
त्यांनी सांगितले की, भाजपा आगामी निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबाची शिवसेना पक्षासोबत युती करून लढवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची अफाट लोकप्रियता, त्याच्या सरकारचे काम, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारचे काम आणि पक्षाच्या संघटनात्मक ताकदीच्या जोरावर आम्ही यश मिळवू. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात ४८ पैकी किमान ४५ जागा व विधानसभा निवडणुकीत किमान २०० जागावर आम्ही यशस्वी होऊ. आमच्या विरोधात तीनही पक्ष एकत्र आले तरी आम्ही विजय मिळवू.
महाविकास आघाडी ही वैचारिक आधारावर नव्हे तर केवळ भाजपाला दूर ठेऊन सत्ता मिळविण्यासाठी निर्माण झाली. पण विचार सोडल्यामुळे आता पारंपरिक मतदार दुरावण्याच्या भितीने कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शिवसेनेवर टीका करत आहेत, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- Travel Tips | भारतातील ‘या’ ठिकाणी तुम्ही करू शकता फ्री मुक्काम
- MNS on Congress | भारत जोडो नाही तर ‘कॉंग्रेस जोडो यात्रा’ काढण्याची कॉंग्रेसला गरज ; मनसेची टीका
- Lunar Eclipse | चंद्रग्रहण झाल्यानंतर ‘या’ पद्धतीने घर करा स्वच्छ
- Sharad Pawar | आजारी असताना देखील शरद पवार शिर्डीतील सभेत पाच मिनिटे बोलले
- BJP on Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलं ; भाजप मंत्र्याची टीका
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.