Chandrashekhar Bawankule | “आणखी वेळ आहे, उमेदवार बदलता येईल”; बावनकुळेंचं विरोधकांना पुन्हा आवाहन

Chandrashekhar Bawankule | मुंबई : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केला आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर आता या रिक्त जागी ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपचे नेते आणि पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने हे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. महाविकास आघाडीनेही मोठा निर्णय घेत हेमंत रासने यांच्याविरोधात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे.

कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ४८ तासांत उमेदवार बदलतो, निवडणूक बिनविरोध करणार का? असे आवाहन महाविकास आघाडीला दिले होते. यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना पुन्हा आवाहन केल्याचे पाहायला मिळाले आहे.

“वेळ आहे उमेदवार बदलता येईल” (There is still time, the candidate can be changed)

“आणखी वेळ आहे, उमेदवार बदलता येईल. चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार, पक्ष विचार करेल”, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन विरोधकांना केले आहे.

“महाविकास आघाडीचा उमेदवार नसेल तर टिळकांना उमेदवारी दिली जाईल. चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे नेतृत्व विचार करेल. चंद्रकांत पाटील यांची भूमिका पक्षाला मान्य आहे. महाविकास आघाडीने आज तसे कळवले तर उद्याचा दिवस बाकी आहे. उमेदवार बदलण्याचा निर्णय निश्चितपणे घेता येईल”, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.

“भाजप कुणावर अन्याय करत नाही” (BJP does no injustice to anyone)

“मुक्ता टिळक हयात असत्या तर प्रश्नच नव्हता. कोणी कोणाला डावलत नाही. ब्राह्मण समाजाने भाजपसाठी आयुष्य दिले आहे. पक्षाने ब्राह्मण समाजाला न्याय दिला आहे आणि ब्राह्मण समाजानेही खूप काही दिले आहे. महाविकास आघाडीने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पाठिंबा दिला तर उमेदवार बदलण्याचा विचार करण्यात येईल. भाजप कुणावर अन्याय करत नाही. महाविकास आघाडीने एक पाऊल मागे घेतले तर दोन्ही मतदारसंघाच्या निवडणुका बिनविरोध करायला तयार आहे”, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी

कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे, असं ट्विट नाना पटोले यांनी केलं आहे. उमदेवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर आजच हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

नाना पटोलेंचं ट्वीट(Nana Patol’s Twit)

पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

नाना पटोलेंचा धंगेकर यांना फोन (Nana Patole called to Ravindra Dhangekar)

“मला उमेदवारी दिल्याचं कालच नाना पटोले यांनी फोनवरून सांगितलं. काल रात्री नाना पटोलेंचा मला फोन आला. यावेळी त्यांनी तयारी करा, फॉर्म भरा असे आदेश दिले. त्यामुळे मी आज वरिष्ठाच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहे”, असं रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-