Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण केल्याचे समोर आल्यानंतर भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. दहशतवाद्याच्या कबरीचे सुशोभीकरण म्हणजे देशद्रोह आहे, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी किती तडजोड केली, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी बावनकुळे यांनी केली आहे.

या घटनेमुळे महाराष्ट्र कलंकित झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. कबरीच्या सुशोभीकरणासाठी जबाबदार लोकांवर गंभीर गुन्हे दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी शिंदे सरकारला केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.