Chandrashekhar Bawankule | “उद्धव ठाकरे यांच्या बेईमानीचा बदला ‘या’ मराठ्या मर्दाने घेतला”, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान

Chandrashekhar Bawankule | मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजप पक्षासोबत युती केले. या घटनेवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी झणझणीत टीका केली आहे. भिवंडी येथे भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सभा घेतली होती. यावेळी बोलताना त्यांनी मोठं विधान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

आठ वर्षांच्या विकासकामांना ब्रेक लावण्याचं काम गेल्या अडीच वर्षात झालं. जनकल्याणाच्या योजना उद्धव ठाकरे सरकारनं थांबविल्या होत्या. भिवंडीत होणारी विकासकामं उद्धव ठाकरे सरकारनं थांबविली होती. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या बेईमानीचा बदला एकनाथ शिंदे यांच्या रुपानं मर्द मराठ्यांनी घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. उद्धव ठाकरे यांनी बेईमानी केली. त्यामुळं मंत्रीपदावर लाथ मारून एकनाथ शिंदे बाहेर पडले, असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

यादरम्यान, शरद पवार यांच्या ट्रपमध्ये उद्धव ठाकरे गेले होते. मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्राचा सत्तानाश त्यांनी केला, अशी जहरी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली असून 18 महिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फेसबूक लाईव्ह करत होते. 18 महिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालयात आले नव्हते. मी वीस वर्षांपासून आमदार आहे. पण, असं मी कधीचं बघीतलं नाही, असं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.