Chandrashekhar Bawankule | “कलंकित करंटा उद्धव ठाकरे…”; चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Chandrashekhar Bawankule | मुंबई: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नागपूरमध्ये बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता. देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे. कलंकित माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray has had a failed journey as Chief Minister – Chandrashekhar Bawankule 

माध्यमांशी संवाद साधत असताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “जनतेशी बेइमानी करून, मुख्यमंत्री पदाचा अयशस्वी प्रवास म्हणजे उद्धव ठाकरे. त्यांचा अयशस्वी प्रवास महाराष्ट्राच्या जनतेनं बघितला आहे. कलंकित माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या अहंकारासाठी अनेक योजना बंद पडल्या आहे. उद्धव ठाकरेंनी मेट्रो प्रकल्प, शेतकरी योजना इत्यादी गोष्टी बंद पडल्या.”

पुढे बोलताना ते (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “कलंकित माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कर्तुत्व आपण सगळ्यांनी बघितलं आहे. कोरोना काळामध्ये महाराष्ट्राला अंधारात ठेवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे. उद्धव ठाकरे नागपुरात जाऊन देवेंद्र फडणवीस यांना कलंकित म्हणत आहे. तुम्हाला नागपूरची जनता जोड्यानं मारेल. महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलतील त्या ठिकाणी ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येईल.

“सत्तेत आल्यावर मराठा समाजाचं आरक्षण घालवणारा माणूस म्हणजे कलंकित माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. देवेंद्र फडणवीस स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास जपण्यासाठी मरमर काम करतात. मात्र, हा कलंकित करंटा (उद्धव ठाकरे) स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांना साथ देतो,”असही ते यावेळी (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/44mb3bL

You might also like

Comments are closed.