Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना इशारा, म्हणाले…
Chandrashekhar Bawankule | मुंबई : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना इशारा दिला आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली काँग्रेस (Congress) पक्षाची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) बंद पाडण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे. यावरच बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
राहुल गांधी यांच्या वक्तव्याने देशाची मान खाली गेली आहे. वीर सावरकरांबद्दल राहुल गांधी आक्षेपार्ह वक्तव्य करत आहे. काँग्रेस पार्टी (INC) त्याचं समर्थन करत आहे. राहुल गांधी यांना सावरकरांचा इतिहास माहित असूनही ते जाणूनबुजून तो इतिहास दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. चुकीचे वक्तव्य केल्यामुळे देशात त्यांच्याबद्दल घृणा निर्माण होत आहे. देश राहुल गांधी यांना माफ करणार नाही. राहुल गांधींनी या यात्रेतून जे काही एक-दोन टक्के समर्थन कमावलं होतं तो या वक्तव्याने गमावला आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
यावेळी, राजीव गांधींच्या (Rajiv Gandhi) जयंती, पुण्यतिथीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांना आदरांजली वाहतात. मात्र आज माझा प्रश्न आहे की बाळासाहेबांच्या (Balasaheb Thakre) स्मृतिदिनी राहुल गांधी यांनी कुठेही प्रतिमेला फुलं वाहिलीत का, चार शब्द ते बोलले का? उद्धव ठाकरेंनी संपूर्ण पक्ष काँग्रेसच्या वेठीस बांधला आहे. ते काँग्रेसला समर्पित झाले आहेत, असं देखील ते म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधींनी सावरकरांबद्दल चुकीचं वक्तव्य केल्यानंतर उद्धव ठाकरे गट राहुल गांधींच्या यात्रेचा बहिष्कार जाहीर करतील, अशी आमची अपेक्षा होती. मात्र आदित्य ठाकरेंना ते पाठवतात. फक्त उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचं संविधान स्वीकारण्याएवढेच आता बाकी राहिले असल्याचा टोलाही त्यांनी लागावला, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- BJP | “इटालियन पिझ्झाने…” ; शरद पवारांचा VIDEO ट्वीट करत भातखळकरांची राहुल गांधींवर टीका
- Chitra Wagh | “प्यार से जोडने आये हो या नफरत फैलाने?”; चित्रा वाघ यांचा राहुल गांधींना खोचक सवाल
- NZ vs IND 1St T20I | पावसाने घातला धुमाकूळ, सामना वॉशआऊट
- Shraddha Walkar | “…असं वाटणाऱ्या मुलींसोबतच असे प्रकार घडतात”, श्रद्धा वालकर हत्याकंड प्रकरणी ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
- Ashish Shelar | “ठाकरेंच्या काळात बिल्डर, बार मालकांवर…” ; आशिष शेलारांचा जोरदार निशाणा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.