Chandrashekhar Bawankule | जनता तुमच्या ‘मेरा घर – मेरे बच्चे’ मोहिमेला साथ देणार नाही; बावनकुळेंचा शरद पवारांना इशारा
Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पाटण्यात झालेल्या बैठकीबद्दल बोलत असताना सरकारवर टीका केली होती. त्यांचं (शिंदे-फडणवीस सरकार) पोरकटपणाचं भाष्य आहे, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांच्या या वक्तव्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. जनता तुमच्या ‘मेरा घर – मेरे बच्चे’ मोहिमेला साथ देणार नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहे.
You have not seen a true NCP worker – Chandrashekhar Bawankule
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विट करत बावनकुळे म्हणाले, “आदरणीय पवार साहेब, पोरकट आणि स्वतःच्याच मुलाबाळांना सत्ता मिळाली म्हणून कोण राजकारण करत आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्याध्यक्ष निवडताना सुध्दा तुम्हाला राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता दिसला नाही आणि तुम्ही सुप्रियाताईंच्या हाती सूत्र दिली यातच सर्व आलं. कार्याध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करायची हा तुमचा प्रश्न आहे. पण देश वाचविण्याच्या नावाखाली तुम्ही विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहात पण तुमची एकजूट देशासाठी नाही तर तुमच्या परिवाराला सत्ता मिळावी यासाठी आहे. हे लोकांना माहीत आहे.”
आदरणीय पवार साहेब,
पोरकट आणि स्वतःच्याच मुलाबाळांना सत्ता मिळाली म्हणून कोण राजकारण करत आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्याध्यक्ष निवडताना सुध्दा तुम्हाला राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता दिसला नाही आणि तुम्ही सुप्रियाताईंच्या हाती सूत्र दिली…— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 26, 2023
“मा. मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली गेल्या नऊ वर्षांत जनतेचं राज्य सुरू आहे पण तुम्हाला ते बघवत नाही. म्हणून तुम्ही आमच्या राजकारणाला पोरकट राजकारण म्हणून हिणवत आहात पण जनता तुमच्या ‘ मेरा घर – मेरे बच्चे‘ मोहिमेला साथ देणार नाही. कोण पोरकट राजकारण करतंय आणि कोण देशहिताचं राजकारण करतंय? हे २०२४ मध्ये जनता तुम्हाला दाखवून देईल”, असही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, आज (26 जुन) सकाळी पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी सरकारला सुनावलं आहे. शरद पवार म्हणाले, “विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान पदाबद्दल कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. त्यामुळे जे याबद्दल बोलतं आहे, त्यांचं हे पोरकटपणाचं भाष्य आहे. महागाई, बेरोजगारी, समाजातील वाद या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Chitra Wagh | उद्धव ठाकरे, चोराच्या उलट्या बोंबा मारू नका – चित्रा वाघ
- Deepak Kesarkar | बेजबाबदार, बेलगाम किती बोलावे याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे आदित्य ठाकरे – दीपक केसरकर
- Aditya Thackeray | ठाकरे गट चिंतेत? आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण ED कार्यालयात दाखल
- Ashish Shelar | “मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे..”; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात
- Shreyas Iyer | टीम इंडियाच्या चिंतेत भर! श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत मिळाली मोठी अपडेट
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Jx8RGd
Comments are closed.