Chandrashekhar Bawankule | “त्यांचे पक्ष तेच बुडवतील…”, चंद्रशेखर बावनकुळेंचा शिवसेना अन् राष्ट्रवादीवर निशाणा

Chandrashekhar Bawankule | मुंबई : शिवसेना पक्ष भाजप पक्षानेच फोडल्याचा आरोप केला जात असतानाच राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजप पक्षावर आणखीन एक आरोप केला होता. यावेळी राष्ट्रवादी फोडण्याचा डाव भाजप करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावर भाजप (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस अथवा काँग्रेस पक्ष फोडण्याचा कोणताही प्रयत्न सुरू नाही, तसेच या दोन पक्षांसोबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वाबद्दल प्रचंड नाराजी असून ते पक्ष स्वतःहून राजकीयदृष्ट्या बुडतील, असा खोचक टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.

आगामी काळात भाजपमध्ये अनेक आश्चर्यकारक पक्षप्रवेश झालेले दिसतील, असा दावा देखील त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे काम करण्याची संधी होती; परंतु त्यांनी त्या वेळी हिंदू सणांवर बंदी घातली. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्री आणि दिवाळी अशा सर्व सणांवरील निर्बंध हटवले. भाजपने हिंदू संस्कृतीतील सण धूमधडाक्यात साजरे केले तर त्यावर राजकारण म्हणून टीका करणे योग्य नसल्याचा घणाघात देखील बावनकुळेंनी केला आहे.

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी फोडण्याचं भाजपचं टार्गेट आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.सोमवारी भाजपच्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णयावर देखील टीका केली होती. हा निर्णय आधीच घेतला असता तर महाराष्ट्राची पंरपरा जपली गेली असती असं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.