Chandrashekhar Bawankule | “प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे”; मनुस्मृतीवरील विधानावरुन बावनकुळेंचा हल्लाबोल

Chandrashekhar Bawankule | नागपूर : भाजपा आणि संघाने जर मनुस्मृतीची विचारधारा सोडली तर आम्ही त्यांच्यासोबतही बसायला तयार आहोत”, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सुनावलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “किंचित सेना आणि वंचित सेना एकत्र झाली. मात्र महाविकास आघाडीतील बाकी घटकांना हे माहित नाही. नाना  पटोले देखील बोलले त्यांना हे मान्य नाही. महाविकास आघाडी याबाबत काही निर्णय येईल मला याबाबत काही बोलायचे नाही. कितीही किंचित सेना आणि वंचित सेना एकत्र झाली तरी भाजपला अडचण येणार नाही. हे आमच्यासाठी नवीन नाही.”

“महाविकास आघाडीलाही आम्ही टक्कर देऊ शकतो. एवढंच नाही तर प्रकाश आंबेडकर यांनी जे मनुस्मृतीविषयी जे वक्तव्य केलं कारण ते इतक्या लहान डोक्याचे आहेत. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेलं शासन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. तसं भाजपामध्ये सर्वाधिक आदिवासी आणि मागास वर्गांचे कार्यकर्ते आहेत. हे त्यांना कळत नसेल तर काय बोलणार”, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य काय?

“कोणताही पक्ष हा एकमेकांचा राजकीय शत्रू सध्याच्या घडीला नाही. मतभेद असू शकतात, हे मतभेद टोकाचे ठरू शकतात. पण भाजपा आणि संघाने जर मनुस्मृतीची विचारधारा सोडली तर आम्ही त्यांच्यासोबतही बसायला तयार आहोत”, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. पुढे ते म्हणाले, “आमचे आणि आरएसएस, भाजपाचे टोकाचे मतभेद आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा भाजपा असो ते आजही मनुस्मृती मानतात. आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधातला आहे. भाजपा आणि संघाने जर मनुस्मृती सोडली आणि घटनेच्या चौकटीत राहून काम करणार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत युतीसाठी विचार करू.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.