Chandrashekhar Bawankule | “बाळासाहेब ठाकरे यांनी हीच संस्कृती शिकवली का?”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
Chandrashekhar Bawankule | नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
राज्यपालांच्या सडक्या मेंदूमागे कोण आहे?, असा सवाल करत अधिक चांगला वृद्धाश्रम असेल, तर राज्यपाल कोश्यारी यांना तिकडे पाठवा, असा खोचक टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी लगावला. यावर राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा अवमानच केला नाही, असा दावा करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.
बावनकुळे म्हणाले, “सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते. त्यांनी आता काही बोलणे म्हणजे विनोद केल्यासारखे आहे. राज्यपालांबद्दल उद्धव ठाकरे यांनी असं बोलणे योग्य नाही. राज्यपालांवर अशा पद्धतीने कोणी टीका करत नाही.”
तसेच “त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे कोणीही समर्थन करत नाही. पण राज्यपालांची वृद्धावस्था काढली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हीच संस्कृती शिकवली का?”, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.
काय म्हणालेत उद्धव ठाकरे?
“त्यांना राज्यपाल म्हणण मी सोडून दिलंय. कारण राज्यपाल पदाची झुल पांघरली म्हणजे त्यांनी काहीही वेडवाकडं बोलावं. हे काही महाराष्ट्र मान्य करणार नाही”, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. पुढे ते म्हणाले, जरासा एक शब्द वापरतोय कुणी गैरसमज करू नये, म्हणजे खास करून ज्येष्ठ नागरिकांबद्दल मी बोलतो आहे. ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? हा सुद्धा एक प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे आणि राज्यपाल नियुक्तीचे निकष सुद्धा ठरवायला पाहिजेत, असं माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- BJP | “याला असंवेदनशीलता म्हणायचं की माज?”; उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत भाजपचा खोचक सवाल
- Shikhar Dhawan | अर्धशतक करत, शिखर धवनने लिस्ट-ए करियरमध्ये पूर्ण केल्या 12 हजार धावा
- Sanjay Raut | “त्यांचा अंतही अघोरीसारखाच होईल” ; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला
- Eknath Shinde | “आत्मविश्वास होता म्हणून…”, ज्योतिषाकडे जाण्यावरुन शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
- IND vs BAN | बांगलादेश दौऱ्यावर जडेजाच्या जागी खेळणार ‘हा’ खेळाडू
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.