Chandrashekhar Bawankule | बाळासाहेब लढवय्ये तर उद्धव ठाकरे रडोबा आहे; चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Chandrashekhar Bawankule | मुंबई: सत्ता संघर्षाच्या निकालानंतर प्रतिक्रिया देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना नैतिकता शोभत नाही, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका करत बावनकुळे म्हणाले, “बाळासाहेब लढवय्ये होते. पण उद्धव ठाकरे रडोबा झाले आहेत. लोकांना रडोबाचे राजकारण चालत नाही. त्याचबरोबर रडोबाच्या राजकारणात विकास होत नाही. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे.”

चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांना देखील सुनावलं आहे. आमचे राणे संजय राऊतांना धुवून काढतात, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे. बोलताना बावनकुळे म्हणाले, “संजय राऊत आंघोळीचा साबण काँग्रेसचा वापरतात. तर पावडर राष्ट्रवादीची वापरतात. मात्र, आमचे नितेश राणे त्यांना धुवून काढतात.”

गेल्या सहा महिन्यापासून आम्हाला अजित पवार भेटले नाही. आम्ही त्यांच्या किंवा ते आमच्या संपर्कात सुद्धा नाही. राष्ट्रवादीत राहणार असल्याचं त्यांनी स्वतः जाहीर केलं आहे. महाविकास आघाडीतील काही नेते अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत आहे, असं देखील बावनकुळे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.