Chandrashekhar Bawankule | “महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे”; चंद्रशेखर बावनकुळेंची सडकून टीका

Chandrashekhar Bawankule | नागपूर : अनेक नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं, श्रद्धा वालकर हत्त्या प्रकरण (Shraddha Walkar Murder Case) आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद या मुद्द्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवर काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केलं. पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या हकालपट्टीची मागणी केली.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यपालांच्या सडक्या मेंदूमागे कोण आहे?, असा सवाल युद्ध ठाकरेंनी केला. अधिक चांगला वृद्धाश्रम असेल, तर राज्यपाल कोश्यारी यांना तिकडे पाठवा, असा खोचक टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी लगावला. यावर राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा अवमानच केला नाही, असा दावा करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.

तसेच “त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे कोणीही समर्थन करत नाही. पण राज्यपालांची वृद्धावस्था काढली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हीच संस्कृती शिकवली का?”, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. “सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते. त्यांनी आता काही बोलणे म्हणजे विनोद केल्यासारखे आहे. राज्यपालांबद्दल उद्धव ठाकरे यांनी असं बोलणे योग्य नाही. राज्यपालांवर अशा पद्धतीने कोणी टीका करत नाही”, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.