Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: आज (23 जुन) पाटणा शहरामध्ये विरोधी पक्षाची बैठक सुरू आहे. या बैठकीला देशासह राज्यातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील या बैठकीला उपस्थित आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मोदींना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे कुठेही जाऊ शकतात, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Uddhav Thackeray has abandoned ideology – Chandrashekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विचारांपुढे आत्मसर्पण केलं आहे. उद्धव ठाकरे काहीही करू शकतात. त्यांनी सगळी विचारधारा सोडून दिली आहे . त्यामुळे ते पाटणाला आणि अजून कुठेही जाऊ शकतात.”
पुढे बोलताना ते (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे कुठेही जातील. कारण त्यांनी विचारधारा सोडून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधात काही करायचं असेल तर उद्धव ठाकरे त्या रांगेत पहिल्या क्रमांकावर उभे असतील.”
दरम्यान, आज होणाऱ्या या विरोधी पक्षाच्या बैठकीमुळे सत्ताधारी (Chandrashekhar Bawankule) आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. त्याचबरोबर या बैठकीत नक्की काय चर्चा होणार? याचा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Praful Patel | पवार साहेबांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसवायचं स्वप्न पूर्ण झालचं पाहिजे – प्रफुल्ल पटेल
- Chitra Wagh | इमानदारीने देशाची सेवा करणाऱ्या मोदींच्या विरोधात हे सर्व एकत्र आले; विरोधी पक्षाच्या बैठकीवर चित्रा वाघांची प्रतिक्रिया
- Keshav Upadhye | हिंदुत्वाच्या विरोधातील ममता बॅनर्जी यांच्या जोडीला आदित्य ठाकरे बसणार – केशव उपाध्ये
- PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेच्या ‘या’ फीचरमुळे KYC करणं झालं सोपं
- Ambadas Danve | देशावर प्रेम करणारे सर्व पक्ष आज एकत्र; विरोधी पक्षाच्या बैठकीवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया
Original NEWS SOURCE – https://bit.ly/43W5Bw1