Chandrashekhar Bawankule | मोदीजींना देशहिताची चिंता आहे तर विरोधक स्वतःच हित जपण्यासाठी एकत्र – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पाटणा येथे विरोधी पक्षाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) उपस्थित राहणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीवर प्रतिक्रिया दिली आहे. विरोधक स्वतःच हित जपण्यासाठी एकत्र आले असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विरोधी पक्षाच्या होणाऱ्या बैठकीवर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत जाऊन देशाची मान उंचावत आहे. मोदींना देश हिताची चिंता आहे तर विरोधक स्वतःच हित जपण्यासाठी एकत्र आले आहे, असं बावनकुळे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

Chandrashekhar Bawankule’s tweet on opposition party meeting

एकीकडे पंतप्रधान @narendramodi
जी अमेरिकेत जाऊन देशाची मान उंचावत आहेत तर दुसरीकडे मोदीजींच्या विरोधात गळा काढण्यासाठी विरोधक आज पाटण्यात एकत्र येत आहेत. मोदीजींना देशहिताची चिंता आहे तर विरोधक स्वतःच हित जपण्यासाठी एकत्र आलेत. एकत्र आलेल्या विरोधकांना जनतेची नाही तर आपल्या मुलांची चिंता आहे. सोनिया गांधी राहुल गांधींना पंतप्रधान करु इच्छितात, शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांची चिंता आहे. उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंचं भविष्य दिसतंय. त्यामुळे आपल्या पोराबाळांच्या भविष्यासाठी विरोधक एकवटले आहेत. पण देशातील जनता या विरोधकांचा डाव ओळखून आहे. २०१९ सालीही जनतेनं मोदीजींवर विश्वास टाकत फक्त आपल्या कुटुंबाचं हित बघणाऱ्या विरोधकांना घरी बसवलं होतं आता २०२४ मध्येही जनता मोदीजींची साथ देणार आहे.

दरम्यान, विरोधी पक्षाच्या बैठकीला जाण्यापूर्वी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी बोलत असताना शरद पवार म्हणाले, “आजच्या आमच्या बैठकीमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. मणिपूर सारख्या राज्यामध्ये लोक रस्त्यावर उतरले आहे. जिथे भाजपची सत्ता नाही तिथेच हे सर्व घडत आहे. या घटना देशाच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन पुढची लाईन ठरवणार आहोत.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/46mqFxi