Chandrashekhar Bawankule | पुणे : पुण्यातील विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अखेरच्या टप्प्यात प्रचार सुरू असतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासहित उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल करत असताना मुस्लिमांच्या मतावर भाष्य करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
“उद्धव ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकलीय म्हणून”
“उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यामुळे आणि राहिलेल्या लोकांना थांबवून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे मध्यावधीची वक्तव्य करतायत” असाही पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
“शरद पवारांना फक्त मुस्लिमांची मतं पाहिजेत?”
“शरद पवारांना फक्त मुस्लिमांची मतं पाहिजेत का? शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा एक नेता हिंदू विरोधी भाषण करतो, शरद पवार त्याला थांबवत नाही, हे चुकीचे आहे, पवारांनी भाषण थांबवलं पाहिजे होते”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हणाले आहेत.
“कसब्याची निवडणूक लढत असतांना आम्ही विकासावर निवडणूक लढत आहे. पण आमच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. जी टीका आम्ही बोलू शकत नाही त्या भाषेत आमच्यावर टीका केली जाते. महायुतीचे उमेदवार असलेले हेमंत रासने हे शंभर टक्के निवडून येईल” असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
“कसबा हा गिरीश बापटांचा आहे, मुक्ता टिळक यांनी कसब्यात मोठी कामं केली आहेत, त्यानंतर आता हेमंत रासने या मतदारसंघात विकासकामं करणार, कसब्यात आमचा 100 टक्के विजय आहे”, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Sanjay Raut | “कोण शहाजी?, भोसले घराण्याचा अपमान होतोय”; राऊतांची शहाजीबापूंवर जहरी टीका
- Sanjay Raut | “कायदा तुमच्या घरात नाचायला ठेवला आहे का?”; राऊतांचा श्रीकांत शिंदेंना सवाल
- Sanjay Raut | “नारायण राणेंना तर बाईनं पाडलंय”; अजितदादांच्या या वक्तव्यावर राऊतांची स्तुतीसुमनं
- Jayant Patil | “ही निवडणूक सर्वांसाठी एक संधी, गद्दारांना आणि महाराष्ट्राद्रोहींना धडा शिकवण्याची”
- Job Opportunity | जॉब अलर्ट! नागपूरमध्ये ‘या’ संस्थेत नोकरीची संधी