Chandrashekhar Bawankule | “समान किमान कार्यक्रम घेऊन बंगळुरूमध्ये गेलेले उद्धव ठाकरे…”; चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: काल आणि आज (17 जुलै आणि 18 जुलै) कर्नाटकच्या बंगळुरू शहरामध्ये विरोधकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जवळपास 24 राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे.
तर राज्यातून शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut) आदी नेते या बैठकीला हजेरी लावणार आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना काही प्रश्न विचारले आहे. ज्या ठिकाणी तुमच्या (उद्धव ठाकरे) हजेरीत विरोधकांची बैठक होत आहे, तिथे हिंदू विरोधासाठी, हिंदू मनोधर्य खच्चीकरणासाठी सत्तेवर आलेले काँग्रेस सरकार टपून आहे, असं बावनकुळे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
Today is the time for Uddhav Thackeray to clarify his position – Chandrashekhar Bawankule
ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी जी यांना विरोध करण्याचा “समान किमान कार्यक्रम “घेऊन बंगरुळूमध्ये गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आज आली आहे.
हीच ती वेळ! उद्धवजी, ज्या ठिकाणी तुमच्या हजेरीत विरोधकांची ही बैठक होत आहे, तिथे हिंदू विरोधासाठी, हिंदू मनोधर्य खच्चीकरणासाठी सत्तेवर आलेले काँग्रेस सरकार टपून आहे.
पंतप्रधान मा. श्री @narendramodi जी यांना विरोध करण्याचा "समान किमान कार्यक्रम "घेऊन बंगरुळूमध्ये गेलेल्या @uddhavthackeray यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आज आली आहे.
हीच ती वेळ!उद्धवजी, ज्या ठिकाणी तुमच्या हजेरीत विरोधकांची ही बैठक होत आहे, तिथे हिंदू विरोधासाठी, हिंदू…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 18, 2023
▪️भाजपाने सरकार असताना मंजूर केलेला” धर्मांतर विरोधी कायदा” नव्या काँग्रेस सरकारने रद्द केला.
तुम्ही मूग गिळून गप्प बसले.!
▪️कर्नाटक मंत्रिमंडळाने यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
तुम्ही गप्प बसले!
▪️ज्या ठिकाणी ही बैठक होत आहे, तिथे राष्ट्रएकतेच्या विचारांवर घाला घालण्यात येत आहे.
तुम्ही सहभागी झाले!
▪️उद्धवजी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचे पाईक आहोत, असे सांगणारे तुम्ही यावर काही बोलणार आहात की नाही?
की, मूग गिळून बसणार?
▪️कोर्टाच्या निर्णयापर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा,अशी मागणी विधान परिषदेत करणारे तुम्ही या बैठकीत सीमाप्रश्न मांडणार आहात की नाही? भूमिका घेणार आहात की नाही?की, फक्त महाराष्ट्रात “टोमणे” मारणार, हात वर करून भाषणबाजी करणार आहात?
की, पुन्हा मूग गिळून बसणार?”
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर बावनकुळेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उद्धव ठाकरे काय उत्तर देतील? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Bacchu Kadu | मुख्यमंत्र्यांची अडचण दूर करण्यासाठी मी मंत्रिपदाचा दावा सोडला – बच्चू कडू
- Ambadas Danve | किरीट सोमय्या यांच्याविरोधात मी पुरावे सादर करेल; अंबादास दानवेंचा मोठा दावा
- Kirit Somaiya | आक्षेपार्ह व्हिडिओनंतर किरीट सोमय्यांचं फडणवीसांना पत्र, म्हणाले…
- Rohit Pawar | ‘डबल-ट्रिपल इंजिन’ म्हणजे केवळ ‘बोलाचा भात अन् बोलाचीच कढी’; रोहित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर समता पक्षाचा दावा; आजच्या सुनावणीत नेमकं काय झालं?
Original NEWS SOURCE – https://bit.ly/46VoelO
Comments are closed.