Chandrashekhar Bawankule | “संजय राऊतांना मिरची…”; चंद्रशेखर बावनकुळे यांचा राऊतांवर पलटवार

Chandrashekhar Bawankule | पुणे: भाजपचे राष्ट्रीय नेते जे. पी. नड्डा (J. P. Nadda) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. राज्यामध्ये त्यांचे तब्बल 13 कार्यक्रम आहे. आज ते पुण्यामध्ये बैठकीसाठी येणार आहे. जे. पी. नड्डा यांच्या दौऱ्याबाबत प्रतिक्रिया देत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर पलटवर केला आहे. संजय राऊत यांना निवडणुकीमध्ये कळेल की जे. पी. नड्डा कोण आणि काय आहेत?, अशा शब्दात बावनकुळे राऊतांवर टीका केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “मुंबईत कुणी आलं तर शिवसेना किंचित होईल अशी राऊतांना भीती वाटते. त्यांचे नेते भाजपमध्ये येतील अशी भीती त्यांना वाटते. जे. पी. नड्डा राज्यात सगळीकडे फिरत आहे. आम्ही म्हणालो मुंबई महानगरपालिका निवडणूक आम्ही जिंकू म्हणून संजय राऊत यांना मिरची लागली असेल. प्रभाग रचनेत त्यांच्या सरकारने नियमांचं उल्लंघन केलं आहे.”

संजय राऊत नक्की काय म्हणाले? (What exactly did Sanjay Raut say?)

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ” जे. पी. नड्डा तुम्ही भाजपचे राष्ट्रीय नेते आहात. मुंबईमध्ये येऊन लुडबुड करू नका. मुंबई ताब्यात घेण्यासाठी तुम्ही बेकायदेशीर मार्गाने प्रयत्न करत आहात. कर्नाटकमध्ये तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. तुम्ही त्यावर बोलायला हवं. कर्नाटक हे भाजपच्या काळातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार होतं.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “भाजप सरकारच्या काळात मिस्टर 40% असं कर्नाटकमधील उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना म्हटलं जात होतं. नड्डांनी त्यावर बोलावं. त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारने किती हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, याची प्रकरण मी त्यांना पाठवून देईल, त्यांनी त्यावर भाष्य कराव.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/45432ce