InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

चांद्रयान – 2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार

- Advertisement -

भारताच्या चांद्रयान-2 ने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चांद्रयान-2 ने आज चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असल्याची माहिती इस्रोने दिली. आता 7 सप्टेंबरला चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण भागात उतरणार आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे ही एक अवघड प्रक्रिया असल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के.सिवन यांनी सांगण्यात आले होते.

- Advertisement -

सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली. यामुळे एक महत्त्वाची मोहिम आता फत्ते झाली आहे.चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे इस्रोच्या चंद्रयान-2 मोहिमेतील दुसरा महत्वाचा आणि कठीण टप्पा असल्याचं इस्रोचे अध्यक्ष के. सीवन यांनी होतं. त्यामुळे ही ऐतिहासिक कामगिरी इस्रोसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. 22 जुलै रोजी चांद्रयान-2 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र येथे लॉन्च करण्यात आलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.