InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘शरद पवार हे शेतकऱ्यांची जाण असणारे एक चांगले नेते’; चंद्रकात पाटलांनी केलं कौतुक

- Advertisement -

कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरात चार लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले असून पांडुरंग हरि वासुदेव हरिच्या जयघोषाने पंढरीचा आसमंत दुमदुमत आहे. यंदाची शासकीय महापूजा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यांच्या समवेत पुजा करणयाचा मान सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग गावातील सुनील ओमासे व सौ.नंदा ओमासे दाम्पत्याला मिळाला यंदाच्या वारीवर अतिवृष्टीचा पुर्ण परिणाम झाला आहे. भाविकांच्या संख्येत घट झाली आहे. निसर्गाचा समतोल राहू दे शेतकरी सुखी होऊ दे हीच प्रार्थना राज्यकर्त्यांबरोबर येणारे भाविक विठ्ठलाच्या चरणी करीत असल्याचे दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने सर्वाधिक जागा देऊनही अद्याप राज्यात सरकार स्थापन होत नाही, याच दुःख चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त करत राष्ट्रपती राजवटीचे संकेत दिले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच त्यांनी कौतुक केले आहे. राज्यात महापूर आणि त्यानंतर आलेला पाऊस यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झालेले आहे. शरद पवार हे शेतकऱ्यांची जाण असणारे एक चांगले नेते आहेत, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्या कामाचं कौतुक केले.

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.