सांगलीचा पालकमंत्री बदला, जिल्हा वाचवा; निलेश राणेंची मागणी

मुंबई : केंद्रीय टीमने नुकताच सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये एक सर्व्हे केला आहे. त्यामध्ये या दोन जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करा, असा सल्ला केंद्रीय टीमने राज्य सरकारला दिला आहे.

यावरूनच विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर निशाणा साधायला सुरूवात केली आहे. यावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधत जिल्ह्याचा पालकमंत्री बदलण्याची मागणी केली आहे. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील मैदानात उतरले आहेत.

आता कोरोना आटोक्यात येणार अशा बातम्या सातत्याने काही महिन्यांपूर्वी चालत होत्या. मागच्या आठवड्यात एक सर्वे झाला त्यामध्ये सांगली जिल्ह्यात परत कडक लॅाकडाऊन करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पालकमंत्री बदला जिल्हा वाचवा, अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा