‘मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचे अपयश झाकता येणार नाही, त्यामुळे सीएम नाही पीएम बदला’

नवी दिल्ली : देशाच्या राजकीय वर्तुळातील मोठी घटना गेल्या दोन दिवसांपूर्वी घडली. याघटनेचे सर्वांकडूनच आश्यर्य व्यक्त केलं जातंय. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समजू शकले नाही. मात्र, रुपाणी यांच्या राजीनाम्याने गुजरातच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

यानंतर आता गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर मात्र मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या अनेकांना धक्का देत एका दुसऱ्याच नावाची निवड करण्यात आली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये भाजपाने त्यांची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये मागील सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले आहेत. यावरुन आता काँग्रेसने केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने ट्विटरवर #CM_नहीं_PM_बदलो ही मोहीम सुरु केली असून या अंतर्गत मोदींचे पंतप्रधान म्हणून अपयश अधोरेखित करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.

मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचं अपयश झाकलं जाणार नाही, CM नाही तर PM बदला. भाजप सर्व ठिकाणी आणि सर्व राज्यांमध्ये अयशस्वी राहिली आहे. भाजपने संपूर्ण भारतालाच अपयशी ठरवलं. मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचे अपयश काही झाकले जाणार नाही, असं म्हणत काँग्रेसने टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा