InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अरुणाचल प्रदेशमधील तीन आमदारांना मंत्रिपद देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

- Advertisement -

अरुणाचल प्रदेशमधील तीन आमदारांना एका व्यक्तीने कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून संजय तिवारी असे त्याचे नाव आहे.

तिवारी याने स्वतः खासदार असल्याचे सांगून आमदारांकडून पैसे घेतले होते. आरोपी संजय तिवारीशी त्यांची ओळख गेल्या वर्षी दिल्लीतील एका कार्यक्रमात झाली होती. अरुणाचल प्रदेशला परतल्यानंतर आमदारांनी मंत्रिपदासाठी त्याला फोन केला. त्यावेळी फोनवर आरोपीने वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगत पैशांची मागणी केली. त्यानंतर आमदारांनी आरोपीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर केले; मात्र त्यानंतर तो फरार झाला.

- Advertisement -

या प्रकरणातील आमदारांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या तिन्ही आमदारांनी हे प्रकरण पोलिसांनी प्राधान्याने सोडवावे, अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.