Chhagan Bhujbal | “आदित्य ठाकरे 15 वर्षांपूर्वी येवल्यात आले…”; छगन भुजबाळांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं
Chhagan Bhujbal | मुंबई: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारीला लागले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) नाशिक दौऱ्यावर जाणार आहे.
त्यांच्या या नाशिक दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी येवल्याचा विकास बघावा, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
Chhagan Bhujbal has entered Nashik city
सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाला दोन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाशिक शहरात दाखल झाले आहे. नाशिकमध्ये पोहोचताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यावर टीका केली आहे.
छगन भुजबळ म्हणाले, “आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष फिरत आहे. त्याचबरोबर पावसाळी अधिवेशनाला सुट्टी असल्यामुळे अनेक नेते दौरे करत आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “आदित्य ठाकरे जर 15 वर्षांपूर्वी येवल्यात आले असते, तर त्यांना आधीच्या येवल्यात आणि आत्ताच्या येवल्यात फरक कळला असता.” छगन भुजबळ यांच्या या प्रतिक्रियावर आदित्य ठाकरे काय उत्तर देतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ते शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहे.
सातपूर येथील डेमोक्रसी हॉल या ठिकाणी हा मेळावा पार पडणार आहे. मेळाव्यानंतर आदित्य ठाकरे येवल्याच्या दिशेनं रवाना होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “… म्हणून केंद्र सरकार मणिपूरकडे लक्ष देत नाही”; संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात
- Nilesh Rane | “किती मोठे उपकार उद्धव साहेब आपले…”; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
- Eknath Shinde | राज्याच्या राजकारणात येणार नवीन भूकंप? CM शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर
- Eknath Shinde | “सत्ताधारी असो वा विरोधी पक्षाचा नेता सर्वांनी…”; इर्शाळवाडी घटनेवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया
- Ajit Pawar | “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…”; ‘त्या’ ट्विटमुळं चर्चांना उधाण
Original NEWS SOURCE – https://bit.ly/44SvRHK
Comments are closed.