Chhagan Bhujbal | कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर नव्हे तर ‘तो मर’ – छगन भुजबळांची जीभ घसरली

Chhagan Bhujbal | मुंबई : राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देशाचे कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांच्याबाबत वक्तव्य करताना पुन्हा एकदा त्यांची जीभ घसरली आहे. छगन भुजबळांच्या या वक्तव्यामुळे तेथील अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. छगन भुजबळ यांनी तोम ऐवजी तो मर असा उच्चार केला आहे.

एका कार्यक्रमात बोलताना कृषी मंत्री कोण आपले, अब्दुल सत्तार, ते जिल्हाधिकाऱ्याला म्हणाले तू दारू पितो का? बरं देशाचे कृषी मंत्री कोण आहेत हो, तो मर, ला माहीत नाही, तो मर, अजूनही आम्हाला वाटतं शरद पवार साहेबच कृषी मंत्री आहेत, असा टोला भुजबळांनी लगावला आहे.

स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था, पिंपळगाव बसवंत संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लि., काकासाहेब नगर (रानवड)चा 40वा गळीत हंगाम शुभारंभ सुरू झाला. त्यानिमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला संबोधित करताना भुजबळ यांनी हे विधान केलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी देवी सरस्वती वरुन छगन भुजबळ वादात आले होते. अशातच देशाच्या कृषीमंत्र्या बाबत बोलताना त्यांची जीभ घसरल्याने पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.