Chhagan Bhujbal | ”तुमचा राजीनामा आम्ही नामंजूर करतो” : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal | मुंबई : काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपण राष्ट्रवादीचे कॉग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याविषयी मोठी घोषणा केली. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचं दिसून येतं आहे. तर कार्यकर्त्यांना मोठा धक्काच बसला आहे. शरद पवार यांनी आपल्याकडे आणखी तीन वर्षांचा कालावधी असून त्यानंतर केवळ मार्गदर्शकांच्या भूमिकेत असणार असल्याचं बोलून दाखवले. यामुळे उपस्थित कार्यकर्ती नेते भावुक झाले . पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात फक्त गोंधळ उडाला आहे. तसचं सर्व नेत्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी अशी विनंती केली आहे. पण आता माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील त्यांच्या या निर्णयाला नकार दर्शवला आहे.

आम्ही तुमचा हा निर्णय नामंजूर करतो: छगन भुजबळ (We reject your decision: Chhagan Bhujbal)

माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की,
शरद पवारांच्या निर्णयाला सर्वांनी नकार दर्शवला असून तुमचा हा निर्णय आम्हाला नामंजूर आहे. अशी घोषणा भुजबळ यांनी केली आहे. त्याचबरोबर या निर्णयानंतर छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार, जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाले होते. त्याचबरोबर सभागृहात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनासुद्धा अश्रू अनावर झाले. तसचं पवारांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असुन साहेब तुम्ही ताबडतोब हा निर्णय मागे घ्या, कुणालाही कसलीच कल्पना न देता तुम्ही घेतलेला हा निर्णय आम्हाला मान्य नाही. अशा प्रतिक्रिया देखिल येत आहेत.

दरम्यान, राज्यभरातून सामान्य जनतेचे फोन येत असून तुम्हीच आमचे सर्वेसर्वा आहोत. तुम्ही हा निर्णय मागे घ्यावा अशी आम्ही तुमच्याकडे भीक मागत आहोत अशा भावना सर्व नेत्यांनी व्यक्त केल्या असून अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी विनंती केली आहे. तर जयंत पाटील देखील त्यावेळी भावून झाले. याचप्रमाणे धनंजय मुंडे यांनी पवारांचे पाय धरत विनंती देखील केली .

महत्वाच्या बातम्या-