Chhagan Bhujbal | “देशामध्ये केवळ दबावासाठी ED चा वापर…”; जयंत पाटीलांच्या ईडी चौकशीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आज ईडी चौकशी (ED inquiry) होणार आहे. आयएल अँड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जवाटप केल्याप्रकरणी त्यांना या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशामध्ये केवळ दबावासाठी मन मानेल अशा रीतीने ईडीचा वापर केला जातो, असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.

छगन भुजबळ (Chagan Bhujbal)  म्हणाले, “भारत सरकारच्या तपासणी यंत्रणा कशाप्रकारे वापरल्या जातात हे आपल्याला माहित आहे. पहिल्यांदा याचा वापर माझ्यावर झाला होता. त्याआधी ईडी प्रकरण काय? हे कुणालाच माहीत नव्हतं. वेळोवेळी देशभरामध्ये केवळ दबावासाठी मन मानेल अशा रीतीने ईडीचा वापर केला जातो.”

पुढे बोलताना ते (Chagan Bhujbal) म्हणाले, “भीती निर्माण करू नका. त्याचबरोबर दहशतीचे वातावरण निर्माण करू नका, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आमच्याकडून कोणत्याही प्रकारचं चुकीचं पाऊल उचललं गेलेलं नाही. त्यामुळे कितीही वेळा चौकशी झाली तरी काहीही निष्पन्न होणार नाही.”

“भाजपने सांगितलं आहे की त्यांच्याकडे एक लॉन्ड्री आहे. गुजरातहुन या धुलाईची पावडर येते. अशा प्रकरणांमध्ये त्यांच्याकडे गेल्यावर त्या मशीनमध्ये त्यांना टाकलं जातं आणि त्या पावडरने त्यांना स्वच्छ केलं जातं”, असा टोला छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी भाजपला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3MKZO6i