Chhagan Bhujbal | नाशिक : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादात शिवसेनेने भूमिका जाहीर केली त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही या वादात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), नाना पटोले (Nana Patole) वादात थेट भाष्य केलं आहे.
छगन भुजबळांची प्रतिक्रिया (Chhagan Bhujbal Comment on Nana Patole)
“नाना पटोले यांनीही विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देताना कोणाला विश्वासात घेतलं नाही. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होऊ शकला नाही. त्यानंतरच महाविकास आघाडी सरकार कोसळलं. नाना पटोले यांनी राजीनामा दिला नसता तर कदाचित या सगळ्या घटना घडल्या नसत्या”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
शिवसेनेची भूमिका
थोरात-पटोले वादात शिवसेनेनं बाळासाहेब थोरात यांची बाजू घेतली आहे. बाळासाहेब थोरात हे अनुभवी नेते आहेत. पटोले यांनी हा वाद मिटवावा. त्यांनी मविआ सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाच नसता, तर उद्धव सरकार कोसळलं नसतं, अशा शब्दात शिवसेनेनं आपली भूमिका मांडली आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन घटकपक्षांपैकी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं काँग्रेसच्या अंतर्गत वादावर आता जवळपास भूमिका स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नाना पटोले विरोधात बाळासाहेब थोरात या वादात नाना पटोलेंविरोधात अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद (Dispute between Nana Patole and Balasaheb Thorat)
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून धुसफूस होती. नाशिक विधान परिषद पदवीधर मतदार संघ निवडणुकीत हा वाद जास्त उफाळून आला आहे. येथील सत्यजीत तांबे हे थोरात यांचे भाचे आहेत. सत्यजीत तांबेंना नाना पटोले यांनी काँग्रेसचे तिकिट मुद्दामहून नाकारले, असा आरोप तांबे-थोरात कुटुंबियांनी केला आहे. तसेच या निवडणुकीत पटोलेंनी प्रचंड राजकारण केल्याचा आरोप थोरात यांनी केला. बाळासाहेब थोरातांनी महाराष्ट्र काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे. यावर हायकमांड काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Sanjay Raut | “मुंबई महापालिका जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत…”; संजय राऊतांची बोचरी टीका
- Weather Update | ‘या’ तारखेपासून राज्यातील थंडी गायब होणार, पाहा हवामान अंदाज
- IND vs AUS | सामनाधिकाऱ्यांनी केली रवींद्र जडेजाची चौकशी, पाहा VIDEO
- ASR | MPL – दिग्विजय, एन्ड्युरन्स उपांत्य फेरीत
- Nagpur Test । नागपूर कसोटी : पॅट कमिन्सचा फलंदाजीचा निर्णय; ऑस्ट्रेलिया १४८ वर ५ विकेट