Chhagan Bhujbal | पक्षाच्या अध्यक्षपदी शरद पवार नाही राहिले, तर आम्ही उपोषणाला बसू – छगन भुजबळ

Chhagn Bhujbal | मुंबई : शरद पवारांनी ( Sharad Pawar) राजीनामा दिल्यानंतर राजकिय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. तर आता मुंबईमधील पक्षाच्या कार्यालयात समितीची बैठक सुरू झाली आहे. यासाठी समितीतील नेत्यांनी उपस्थित लावली. या बैठकीला जाण्यापूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagn Bhujbal)यांनी शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयाबाबत मोठं विधान केलं आहे. जर शरद पवार हे अध्यक्षपदी राहिले नाहीत तर आम्ही उपोषण करू असा इशारा देखील दिला आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ ( What did Chhagan Bhujbal say )

माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, या पदासाठी आम्ही अनेक पर्याय पाहिले. पण शरद पवार यांची जागा घेणारा कोणीच नाही. त्यामुळे शरद पवार साहेबांनीच कायमस्वरुपी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं असा ठराव आमच्याकडून करण्यात येणार आहे. जर त्यांनी तो स्वीकारला नाही तर आम्ही उपोषण करू. असा इशारा भुजबळ यांनी दिला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात समितीच्या बैठकीला छगन भुजबळासह, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आदी नेत्यांनी हजेरी लावली आहे. तसचं कार्यलयाच्या बाहेर कार्यकर्ते आणि इतर नेते देखील जोरदार घोषणाबाजी करत देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो. असं म्हणतं आहेत. पवारांनी राजीनामा दिल्यापासून ते आतापर्यंत एकच नारा सुरू आहे तो म्हणजे काहीही झालं तरी शरद पवार हेच अध्यक्षपदी राहिले पाहिजे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like