Chhagan Bhujbal | “महामोर्चाचा प्रभाव कमी करण्यासाठीच भाजपचं आंदोलन”; छगन भुजबळ यांचा दावा
Chhagan Bhujbal | मुंबईः भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आज महामोर्चाचं आयोजन केलं आहे. क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडिया इमारतीपर्यंत महाविकास आघाडीचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चासाठी महाविकास आघाडीचे नेते मुंबईत दाखल झाले आहेत. पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाजपवर टीका केली आहे.
ते म्हणाले, “मागील दोन महिन्यापासून आम्ही मागण्या करतोय, मात्र सरकारने त्या ऐकल्या नाहीत. आम्ही महामोर्चाचं नियोजन केल्यानंतर भाजपने मागच्या दोन दिवसात आंदोलन आयोजित केलं.” आमच्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये, असा भाजपाचा डाव असल्याचा आरोप छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलाय.
महाविकास आघाडीचा महामोर्चा हे सरकारचा निषेध करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल आहे. आक्रोश आहे. याची तीव्रता वाढत जाणार. लाखो लोक रस्त्यावर उतरणार. त्यामुळे याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटणार असल्याचा इशारा भुजबळ यांनी दिलाय.
भाजपाच्या राज्यपालांपासून मंत्र्यांपर्यंत लोक चुका करतायत. महाराष्ट्राचा अपमान करतायत आणि माफी आम्ही मागयची, अशी मागणी ते करतायत, हा सगळा त्यांचा दिखावा आहे, असा आरोप छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या :
- Amol Mitkari | “दरेकरजी, तुमच्या घरात आंबेडकर, महात्मा फुले यांची प्रतिमा असेल तर फोटो शेअर करा आणि…”; अमोल मिटकरीचं ओपन चॅलेंज
- MVA | ‘महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हल्लाबोल’; महाविकास आघाडीने शेअर केले ‘महामोर्चा’ची झलक दाखवणारे व्हिडीओ
- Sanjay Raut | “शिंदे सरकारचं महाराष्ट्रप्रेम खोक्याखाली चिरडलंय”; संजय राऊत यांचा घणाघात
- Rupali Patil | “ईडी आणि सीबीआयची कारवाई होऊ नये म्हणून शिंदे गटातील आमदार…”; रुपाली पाटलांचा दावा काय?
- Shambhuraj Desai | हिवाळी अधिवेशन संपताच बेळगावात जाऊन चर्चा करु – शंभूराज देसाई
Comments are closed.