Chhagan Bhujbal | राष्ट्रवादीत फुट?, “काल आलेल्या पोरांनी…”, छगन भुजबळांचे रोहित पवारांवर संतापले

Chhagan Bhujbal | मुंबई : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या वक्तव्याने नाराजी झालेल्या राजकीय मंडळीनंतर आता रोहित पवार (Rohit Pawar) यांनी छगन भुजबळांना सल्ला दिल्याने भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी काल सरस्वतीदेवीने किती शाळा काढल्या असा सवाल उपस्थित केल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले.

तुम्ही काळजीपूर्वक बोला, असा सल्ला रोहित पवार यांनी दिला होता. यावर, आम्ही पक्षाचे नाही, साहेबांचे समर्थक आहे अशा शब्दात राष्ट्रावादीला आणि रोहित पवार यांना सुनावण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ती सपना माळी शिवणकर यांनी छगन भुजबळ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे काल आलेल्या पोरांनी, तुम्ही काळजीपूर्वक बोला हे सांगणं चुकीचं आहे, असं म्हटलं आहे.

दरम्यान, आमदार छगन भुजबळ काय चुकीचं बोलत असतील तर ते तुम्ही सिद्ध करा असा टोलाही रोहित पवार यांना त्यांनी लगावला आहे. एवढंच नाही तर, स्वतःला तुम्ही पुरोगामी समजत असाल तर आधी अभ्यास करा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.