Chhagan Bhujbal | “शिवाजी महाराज जुने झाले असतील तर मोदींना…”; राज्यपालांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांचा खोचक सवाल

Chhagan Bhujbal | मुंबई : मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी पुन्हा एका वादग्रस्त वक्तव्य केलंय. कोश्यारी यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत, शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असं वक्तव्य केलंय. यामुळे आता एक नवी वाद सुरु झालाय. राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध करत विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. यावर प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्यपालांना चांगलंच सुनावलं आहे.

“महाराष्ट्रात फार सोशिकता आहे हे त्यांना सांगायला हवं. इतर राज्यात जर असं काही झालं असतं तर अख्खं राज्य पेटून उठलं असतं. राज्यात राज्यपालांचा मान राखला जात आहे. मग राज्यापालांनीसुद्धा तितकंच जबाबदारीने विधान केलं पाहिजे. राज्यपालांनी सगळ्या गोष्टींचा विचार करावा,” असं सांगत त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची कानउघडणी केली आहे.

“राज्यपाल अशी वेगवेगळी वक्तव्यं का करत आहेत हे कळत नाही. शिवाजी महाराज जुने झाले असतील तर मोदींना त्यांची प्रतिमा होर्डिंगवर लावून ‘सबका साथ, सबका विकास, छत्रपतींचा आशीर्वाद’ असं का लिहावं लागतं?,” असा सवाल छगन भुजबळांनी केला आहे. “जगभर महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला जातो. अफजलखानाला पत्रं पाठवणे ही शिवाजी महाराजांची रणनीती होती,” असं यावेळी भुजबळांनी सांगितलं.

त्याचबरोबर “शिवाजी महाराजांची तुलना कृपया कुणाशीही करु नका. तुम्ही प्रथम नागरिक आहात, सांभाळून बोला. काहीही वक्तव्यं करून लोकांना उकसवू नका”, असा इशारा भुजबळांनी यावेळी राज्यपालांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.