Chhagan Bhujbal | नाशिक : काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रदेश काँग्रेस गंभीर आरोप केले. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी अपक्ष आमदार म्हणूनच काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, सत्यजीत तांबे यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भुजबळ यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.
“Satyajeet Tambe wants to leave the Congress party”- Chhagan Bhujbal
“मी इतकी वर्ष झाली, राजकारणात आहे. पण अशा प्रकारे एबी फॉर्म कोण घेतं आणि फॉर्म घेताना पाहत नाही, हे चुकीचं आहे. फॉर्म घेताना सर्व काही पाहिलं जातं. त्यामुळे हे असं कसं झालं? सत्यजीत तांबे यांना काँग्रेस सोडायची असेल म्हणून ते आरोप करत आहेत. यावर आता बाळासाहेब थोरात साहेबांनी बोललं पाहिजे. खरं काय झालं हे थोरात साहेबच सांगू शकतात, असं माझं म्हणणं आहे. जे काही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्यावरून मला वाटतं की, सत्यजीत तांबे काँगेसमध्ये परतणार नाही”, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.
Chhagan Bhujbal Comment on Satyajeet Tambe
“शरद पवार साहेबांनी सांगितलं होतं, हा घरातला प्रश्न सोडवला पाहिजे. त्यांनतर शिवसेना आणि महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. शुभांगी पाटील यांना चांगली मते मिळाली. ती काही कमी मते नाहीत. महाविकास आघाडीने चांगले काम केले आहे. पण तांबेंनी मतदार नोंदणी चांगली केली होती. त्याचा परिणाम त्यांच्या विजयात झाला”, असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत.
Chhagan Bhujbal talk About Pune by Election
“नागपूर आणि अमरावतीमध्ये जो कौल आला, त्यावरून स्पष्टपणे कळतं की, हवा बदलली आहे. तसेच कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलाही फोन केला होता. महाविकास आघाडीचे शीर्षस्थ नेते शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे बघतील काय करायचं ते. सर्व प्रमुख नेते बसून मार्ग काढतील”, असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.
Satyajeet Tambe said ‘I never left Congress Party’
दरम्यान, “मी अनेक संघटनांच्या संस्थांच्या पाठिंब्यावर निवडून आलेलो आहे. टीडीएफ सारख्या संस्थेसह इतर अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. या सगळ्याचा विचार करून मी अपक्ष निवडून आलेलो असल्यामुळे मी भविष्यामध्ये अपक्षच राहील अशी माझी भूमिका असल्याचे वक्तव्य सत्यजीत तांबे यांनी केले आहे. मी काँग्रेस कधीही सोडली नाही, पण आमदार म्हणून अपक्ष म्हणूनच काम करणार आहे”, असे सत्यजीत तांबे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Sanjay Raut | “त्यांनी पत्र लिहलं तरी निवडणूक होणारच”; राज ठाकरेंच्या पत्रानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
- Raj Thackeray – कसबा- चिंचवड पोटनिडणूक बिनविरोध करा; “भाजपने दाखवला तसा उमदेपणा महाविकास आघाडीने दाखवावा” – राज ठाकरे
- Devendra Fadnavis | “‘या’ विमानतळाचं श्रेय नारायण राणेंचंच”; चिपी विमानतळाच्या श्रेयवादाला पुन्हा तोंड फुटले
- Narayan rane | “मी भाजपमध्ये आलो अन् अडचणीत सापडलो”; फडणवीसांसमोरच नारायण राणेंचं खळबळजनक वक्तव्य
- Amol Mitkari | “फडणवीस तांबेंना गोंजरण्याचं काम करत असले तरी…”; अमोल मिटकरींची भाजपवर बोचरी टीका