Chhagan Bhujbal । “आता महाराष्ट्रातील तरुणांनी काय करायचं?, आरती करा, हनुमान चालीसा करा, मोर्चे करा…”; छगन भुजबळ संतापले!

Chhagan Bhujbal | मुंबई : C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ (Tata AirBus Projec) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. या बातमीनंतर महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी यावरून मोठी प्रतिक्रिया दिली.

छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया –

पत्रकारपरिषदेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “टाटा एअर बस प्रकल्पाला मी नाशिकात येण्याचीही विनंती केली होती, त्यांना पत्रही पाठवले होते. यानंतर मी पुढे काही करून शकलो नाही, कारण माझा विभाग वेगळा होता आणि नंतर करोनाशी संबंधित घडामोडीही सुरू होत्या. परंतु, एका पाठोपाठ एक मोठमोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत. वेदान्त, विमानाबाबतचा टाटांचा प्रकल्प याशिवाय आणखी काही प्रकल्प गेले, असं ते म्हणाले.

यानंतर पुढे बोलताना भुजबळ म्हणाले कि, टाटांचं सगळं महाराष्ट्रात आहे, ते कधीही महाराष्ट्राला प्राधान्य देत असतात. पण अचानक काय झालं कल्पना नाही आणि हे सगळे प्रकल्प गुजरातला गेले. आता आपल्या महाराष्ट्राच्या तरुणांनी काय करायचं?, आरती करा, हनुमान चालीसा करा, मोर्चे करा, फटाके उडवा… करायचं काय?, आपण दहिहंडी करत बसलो, करायचं काय? सगळं एवढं शिक्षण होतं, चांगलं होतं. तरी सुद्धा हे प्रकल्प जायला लागले आहेत.

दरम्यान, आज नागपूरमध्ये बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले कि, मुंबईही गुजरातला देऊन टाकेल, अशा शब्दात पटोलेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, ‘महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. देशातील सर्वात जास्त मोठे उद्योग महाराष्ट्रात आहेत. गुजरात महाराष्ट्राच्या मागे आहे, याचे शल्य पंतप्रधान मोदींना आहे. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प आणि संस्था गुजरातला हलवण्याचा सपाटा लावला आहे.

तसेच दुर्दैवानं यापूर्वीचे फडणवीस आणि आताचे ईडी या दोन्ही सरकारांनी महाराष्ट्राच्या हित डावलून मोदींच्या गुजरातच्या हिताला जास्त महत्व दिले आहे. फडणवीस सरकारच्या काळात मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, पालघर येथील प्रस्तावित मरीन अकादमी, मुंबईतील डायमंड बोर्स असे अनेक महत्वाचे प्रकल्प गुजरातला गेले, असा आरोप नाना पटोलेंनी केली.

महत्वाच्या बातम्याः

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.