Chhagan Bhujbal । “ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही आणि…”; राऊतांच्या अटकेवर भुजबळांची मोठी प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal । मुंबई : महाराष्ट्रातील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) ताब्यात आहेत. तर आज त्यांच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी पार पडली आहे. त्यावेळी १० ऑगस्टपर्यंत त्यांची कोठडी मिळावी, अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती. त्यावर कोर्टाकडून संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे अजून ४ दिवस ईडीकडून राऊतांची चौकशी सुरूच राहणार आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले कि, “संजय राऊतांना मिळालेली ईडीची कोठडी हा न्यायालयीन कामकाजाचा भाग आहे. ईडीने न्यायालयात काही गोष्टी मांडल्या असतील. नेमक्या काय गोष्टी न्यायालयासमोर ठेवण्यात आल्या याबाबत मी ऐकलेलं नाही. मात्र, अधिक तपासासाठी न्यायालयाने संजय राऊतांना ईडी कोठडी सुनावली असावी, असं ते म्हणाले.

तर पुढे भुजबळ म्हणाले कि, संजय राऊत निर्दोष सुटतील की नाही याबाबत मला तसं काहीही सांगता येणार नाही. ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही आणि याची सर्वांना कल्पना आहे. त्यातूनही काही मार्ग निघाला तर आमच्या त्यांना शुभेच्छाच आहेत.

दरम्यान, संजय राऊतांच्या ईडी चौकशीने राजकीय वातावरण मात्र तापलं आहे. राऊतांच्या ईडी चौकशीचे पडसाद संसदेत देखील उमटलेले पाहायला मिळेल. मात्र राऊतांवरील कारवाईने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.