ओबीसींच्या आरक्षणावरून फडणवीसांचा भुलभुलैय्या, छगन भुजबळांनी केली टीका

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणाची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे सध्या राज्यात ओबीसींसाठी कोणतंच आरक्षण उरलेलं नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणाबाबतच्या राज्य सरकारच्या भूमिकेचा पर्दाफाश केला. 4 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले होते आणि राज्य सरकारची पुनर्विचार याचिकाही कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं आहे. सध्या महाराष्ट्रात ओबीसीकरिता कोणतंही आरक्षण राहिलेलं नाही, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा तिढा सुटता सुटत नाही आहे. अशात ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही चर्चेत आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत असलेल्या दाव्यात काही तथ्य नाही. फडणवीस हे भुलभुलैय्या करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. या विषयावर आम्हाला राजकारण करायचं नसल्याचंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात आज (१ जून) पदोन्नतीतील आरक्षणाबाबत बैठक झाली.

या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते. या बैठकीनंतर भुजबळांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरून फडणवीस भुलभुलैय्या करत आहेत. आम्हाला त्यावर राजकारण करायचे नाही, असं भुजबळ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा