जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी , काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई – छगन भुजबळ

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना कामाशिवाय   घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. गर्दीमुळे कोरोनाचा  संसर्ग वाढण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे सरकारने मॉल्स ,रेस्टॉरंट, नाट्यगृह ,चित्रपटगृह इत्यादी गोष्टी बंद केल्या आहेत.

तारक मेहताच्या निर्मात्याने केली ‘हि’ अजब मागणी

मास्क आणि सॅनिटायझर यांच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार, साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.
Loading...
साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्या तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या संबंधित रास्तभाव दुकानदार, इतर दुकानदार तसेच संबंधित व्यक्ती, संस्था यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.