Chhatrapati Sambhajinagar – छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती; नामांतरावरून एमआयएम- मनसे कार्यकर्ते भिडले
Chhatrapati Sambhajinagar – छत्रपती संभाजीनगर : राज्य आणि केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी ‘छत्रपती संभाजीनगर’ ( Chhatrapati Sambhajinagar ) नावाला परवानगी दिली. यानंतर या नावाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांनी विरोध केला होता. त्या विरोधात जलील यांनी साखळी उपोषण केले. उपोषणात औरंगजेबाचा फोटो देखील होता. यामुळे संभाजीनगर येथे वाद शिगेला पोहचला होता. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी कॅन्डल लाईट मोर्चा देखील काढला. अशातच आता ‘छत्रपती संभाजीनगर’ नावाला समर्थन देत मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
औरंगाबादचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ असं करण्याला केंद्राने मान्यता दिली आहे. तर दुसरीकडे एमआयएमने या नावाला विरोध दर्शवला आहे. छत्रपती संभाजीनगर या नावाला पाठिंबा देत मनसेने छत्रपती संभाजीनगर मध्ये मोर्चा काढला . यावेळी एमआयएमचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते भिडले. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त शहरात ( Chhatrapati Sambhajinagar ) आहे.
- Nilesh Rane | “हा व्यक्ती स्वतः वडिलांच्या पेन्शनवर जगतोय”; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
- Job Opportunity | रयत शिक्षण संस्थेत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Sugarcane Juice | उन्हाळ्यामध्ये दररोज उसाचा रस प्यायल्याने मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
- Ajit Pawar | अधिवेशानात अजित पवार बोलताना भाजप आमदार मध्येच बोलले; पवारांची हातवारे करत फडणवीसांकडे तक्रार
Comments are closed.