InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार भालकेंची भेट घेणार

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेला पंढरीत येणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकादशीच्या फराळासाठी स्थानिक काँग्रेस आमदार भारत भालके यांच्या घरी जाणार आहेत. त्यामुळे आमदार भालके भाजपच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे मानले जात आहे. आषाढी यात्रा जरी अध्यात्मिक सोहळा असला तरी यात्रेच्या आडून राजकीय भजन,किर्तनही चालत असते. मुख्यमंत्री शासकीय महापूजेला येणार म्हंटल्यावर त्यांच्या स्वागतासाठी पाहुणचारासाठी जिल्ह्यातील राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी धडपड करीत असतात. आजवर पंढरीत आलेले काँग्रेसचे मुख्यमंत्री स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या घरी जेवणासाठी, किंवा फराळासाठी जाण्याची अलिखित परंपरा निर्माण झालेली आहे.

पंढरपूर तालुक्यातील राजकारणावर आजवर दोन्ही काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी केवळ निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला येत असायचे. आता परिस्थिती बदलली असून भाजपचे नेते सत्ताधारी झालेले असताना काँग्रेसचे पदाधिकारी आता निवेदनापुरता उरलेले आहेत. तर स्थानिक काँग्रेसचे काही नेते भाजपात गेलेले आहेत तर काही नेते भाजपच्या उंबरठ्यावर आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply