InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस येत्या २८ तारखेला राजीनामा देतील – अशोक चव्हाण

राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे येत्या २८ फेब्रुवारीला राजीनामा देतील आणि  विधानसभा बरखास्त करतील त्यामुळे राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होतील, असे भाकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. गुरुवारी औरंगाबामधील जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केल आहे.

भाजप नेते भक्षक असून यांच्यापासून लोकांच्या पोरीबाळी काय सुरक्षित राहणार, असं म्हणत ‘भाजपवालोंसे बेटी बचाव म्हणण्याची वेळ आल्याची’ टीका अशोक चव्हाण यांनी केली.

तसेच २८ तारखेला राज्य सरकार बरखास्त होऊन निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे तयारीला लागा अशी सूचनाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply