मुख्यमंत्र्यांवर १९ बंगलो लपवण्याचा आरोप आहे तर त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप !

मुंबई : राज्याच्या राजकारणात सद्या एक चर्चेचा विषय समोर आलाय. राजकीय वर्तुळात याबाबत चर्चेला उधाण आलय. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याची बातमी समोर आली. २००६ सालापासून धनंजय मुंडे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते अशी तक्रार ओशिवरा पोलिस ठाण्य़ात या महिलेने केली होती. या सर्व प्रकरणावर स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे.

यात त्यांनी ज्या महिलेने तक्रार केली आहे तिचे नाव करुणा शर्मा आहे. आणि त्या महिलेसोबत त्यांचे २००३ पासून संबंध होते आणि तिच्यापासून त्यांना २ मुले आहेत असेही त्यांनी लिहिले आहे. सदर महिलेने केलेले आरोप धनंजय मुंडे यांनी फेटाळले आहेत. आणि बदनामीसाठी हे सर्व केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्यावर होणाऱ्या आरोपांवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जळजळीत टीका केली आहे. ‘मुख्यमंत्र्यांवर १९ बंगलो लपवण्याचा आरोप आहे तर त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप ! या ठाकरे सरकारची दयनीय अवस्था झाली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरेवर पाणी फिरवण्याचा काम हे ठाकरे सरकार करत आहे.’ असा आरोप त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.