InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मोहिते पाटलांच्या कट्टर विरोधकाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री हजेरी

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी पंढरपूरमध्ये जाणार आहेत. यावेळी व्यस्त कार्यक्रमातूनही वेळ काढून ते सोलापूर जिल्ह्यातील भाजप नेते राजकुमार पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत .

मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर होण्यापूर्वीच जिल्ह्यातील बडे नेते मुख्यमंत्री त्यांच्याकडे चहापानासाठी, भोजनासाठी येणार असल्याचे सांगत होते. अशातच आता मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत दौऱ्यात मात्र ते जुने मोहिते -पाटील विरोधक राजकुमार पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते अशी ओळख असणारे विजयसिंह मोहिते पाटील यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपशी सलगी केल्याचं पाहायला मिळालं. माढा लोकसभा मतदारसंघात त्यांनी उघडपणे भाजपचे काम केले. त्यामुळे मोहिते पाटीलांची भाजपसोबत जवळीक वाढत असतानाच आता मुख्यमंत्री त्यांच्या एकेकाळच्या कट्टर राजकीय विरोधकाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याने जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.