InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मुख्यमंत्रीजी उत्तर द्या “कटप्पाने बाहुबली को क्‍यो मारा?’ – जयंत पाटील

राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा विरोधी पक्षात दरारा होता मात्र, सत्तेत येताच देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांना मंत्रिपदावर थेट घरी पाठविले. त्यामुळे आपणही विधानसभेत खडसेंना मंत्रिपदावरून हटविल्याबाबत “कटप्पाने बाहुबली को क्‍यो मारा?’ असा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही, असा चिमटा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला.

जयंत पाटील म्हणाले, भाजपचे नेते व राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे काम चांगले आहे, विरोधी पक्षात असताना त्यांचा दरारा होता. विधानसभेत ते आमच्यावर अगदी तुटून पडायचे आमच्यावर आरोप करून आम्हाला अंगावर घ्यायचे, निवडणुकीतही त्यांनी जोरदार प्रचार करून भाजपला निवडून आणले. परंतु सत्ता आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची खडसे यांच्यावर मर्जी खप्पा झाली आणि त्यांनी त्यांना थेट मुक्ताईनगरला पाठवून दिले. या कटप्पा-बाहुबलीच्या खेळात कट्टपाने बाहुबली क्‍यो मारा? असा प्रश्‍न आपण विधिमंडळात उपस्थित केला. मात्र आपल्याला अद्यापही त्या प्रश्‍नाचे उत्तर मिळालेले नाही.

महत्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply