‘छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझाच्या पाटलाला दिलेली शिक्षा मुख्यमंत्र्यांनी डोळ्या समोर आणावी’

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण दररोज पेटत आहे. एकीकडे या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले आहेत. तर दुसरीकडे राठोड यांच्या अडचणी वाढणार की कमी होणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

यावर विरोधी पक्ष भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी देखील नाराजी व्यक्त केली असून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आत कारवाई करावी असं मत व्यक्त केल्याचे देखील सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राठोडांचा राजीनामा घेणार का याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायदानाची आठवण करून देत राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. ‘राजे शिवछत्रपतींच्या राज्यात रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडत, महाराजांनी मानसन्मानाने पाठवणी केलेली सुभेदाराची सून डोळ्यासमोर आणा, मुख्यमंत्री महोदय…म्हणजे या संजय राठोड सारख्या नराधमाचा राजीनामा घेणं तुम्हाला सुलभ होईल,’ असं भाष्य चित्रा वाघ यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.