InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘अजितदादांच्या वक्तव्यावरून आज मुख्यमंत्र्यांनी आपली यात्रा थांबवली’

- Advertisement -

शिवरायांची जन्मभूमी किल्ले शिवनेरीवर मातीचा कलश हाती घेत विरोधकांना संपवून नव्या स्वराज्यस्थापनेची शपथ घेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवनेरी ते रायगड या शिवस्वराज्य यात्रेचा बुधवारी प्रारंभ करण्यात आला. काळ शिवरायांच्या जन्मभूमीवर म्हणजेच जुन्नर मध्ये या यात्रेची पहिली सभा पार पडली.

आज दुसऱ्या दिवशी शिवस्वराज्य यात्रेचे अहमदनगरमध्ये भव्य स्वागत झाले. यात्रेला नगरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते यावेळी सरकारवर ताशेरे ओढले.

- Advertisement -

खा. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांच्या अपयशाचा पाढा वाचत सारकारवर निशाणा साधला. आज राज्यात पूर परिस्थिती असताना मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढण्यात व्यस्त आहेत. अजितदादांनी यांची जाणीव करून दिली आणि आज मुख्यमंत्र्यांनी आपली यात्रा थांबवली. आज काही लोक सोशल मीडियावर खा. शरद पवार साहेबांनी काय केले, असे प्रश्न विचारत आहेत. मात्र, आज महाराष्ट्र कृषी क्षेत्रात प्रगत आहे, भारत निर्यातदार देश बनला आहे, आपल्या बापच्या चेहऱ्यावर जे सुख दिसतंय, ते पवार साहेबांमुळे आहे, असे कोल्हे म्हणाले.

महत्वाचा बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.