मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला; शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतचे केले कर्जमाफ

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दोन लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या घोषणेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.  30 सप्टेंबर 2019 पर्यंत घेतलेलेले कर्ज या कर्जमाफी अंतर्गत माफ करण्यात येणार आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजना असे या कर्जमाफी योजनेचे नाव असेल.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ”गेल्या काही काळात नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येईल. कर्जमाफीच्या प्रकियेची सुरुवात ही मार्च महिन्यांपासून होईल. तसेच कर्जमाफीचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी येत्या १५ दिवसांत योजना जाहीर केली जाईल.”

या कर्जमाफीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र टिका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते ते त्यांनी पाळले नसल्याचे फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.