राज्यातील निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील : राजेश टोपे

मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण कमी होताना दिसतं आहे. परंतु तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यात पुर्वीचेच निर्बंध कायम ठेवले आहेत. तर काही ठिकाणाहून राज्यातील निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी होत आहे. त्यावर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.

“राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना पाॅझिटीव्हिटी रेट कमी झाला आहे. त्या जिल्ह्यातील लावण्यात आलेले निर्बंध कमी करण्यासाठी टास्क फोर्स अभ्यास करत आहे. टास्क फोर्स येत्या दोन दिवसात आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री निर्बंध कमी करण्याबाबतचा निर्णय घेतील,” असं राजेश टिपे म्हणाले.

“महाराष्ट्रात लसीकरण मोहिमेवर जोर देण्यात येत आहे. ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांना नागरिकांसाठी निर्बंध शिथिल करणार असल्याचं देखील त्यांनी याआधी सांगितलं होतं. त्यावर देखील मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स मिळून निर्णय घेणार आहे,” असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा