InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या भाच्याला ईडीकडून अटक, 354 कोटींच्या बँक घोटाळ्याचे आरोप

- Advertisement -

 मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी यांना अंमलबजावणी संचालनालयानं आज सकाळी अटक केलीय. ३५४ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यासंबंधी त्यांना अटक करण्यात आलीय. मोजर बेअर कंपनीचे संचालक असताना त्यांनी कथितरित्या 354 कोटी रुपयांचा बँक घोटाळा केला असे आरोप करण्यात आले आहेत.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीनंतर सीबीआयने रविवारीच पुरी यांच्यासह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात ईडीने पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली. १८ ऑगस्टला पुरी यांच्यावर सीबीआयनं गुन्हा दाखल केला होता.

- Advertisement -

पुरी वगळता कंपनीच्या चार अन्य संचालकांवरही सीबीआयनं गुन्हे दाखल केलेत. त्याआधी सीबीआयनं कंपनीची कार्यालयं आणि आरोपी संचालकांची निवासस्थानं अशा सहा ठिकाणी छापेमारी केली होती. १७ ऑगस्ट रोजी ३५४ करोड रुपयांच्या बँक घोटाळ्या प्रकरणी तक्रार दाखल करून सीबीआयनं छापेमारी केली होती.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.