InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

येत्या विधानसभेला भाजप-शिवसेना युती होणार?

- Advertisement -

येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती होणार की नाही या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश भाजपच्या बैठकीत कोणताही निर्णय दिलेला नाही. भाजपचे प्रदेश पदाधिकारी, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, संघटन मंत्री यांची पक्षांच्या दादरमधील कार्यालयात बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, पक्षाचे प्रमुख मंत्री उपस्थित होते.

येत्या विधानसभा निवडणुकीत युती होण्यासंदर्भात मुख्यमंत्री काय बोलतात या बाबत उत्सुकता होती; पण मुख्यमंत्र्यांनी त्यावर कोणतेही भाष्य केले नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी युतीची घोषणा करताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आम्ही विधानसभेलादेखील एकत्रितपणे सामोरे जावू असे जाहीर केले होते. २३ तारखेच्या निकालानंतर भाजप युतीबाबत काय भूमिका घेते या बाबत उत्सुकता असेल.

- Advertisement -

शिवसेनेच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या नेते/कार्यकर्त्यांनी अतिशय चांगले काम केले, अशी शाबासकी यावेळी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिली.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.